poetry

तानाजी धरणे

आठवणीतले बाबा ....

आठवणीतले बाबा ....


बाबा, तुम्ही गेलात..

रडलो  धाई- धाई

हृदयातील   खल

अजुन ओली लई ...१


बाबा, तुम्ही आमच्यासाठी

सह्याद्रीचा कडा होता

आमच्यासाठी तुमच्या हृदयात

पितृत्वाचा विडा होता ..........२


बाबा, तुम्ही किती खास्ता खाल्या

पायपिट केली , गणना त्याची नाही

बाबा, तुमच्यामुळे आज आम्ही

जिवनामध्ये सुखी लई ...........३


बाबा, राञंदिवस कुटुंबासाठी झटलात

तमा त्याची केली नाही

तुमच्यामुळे घरात शाबुत होतो

आम्ही आणि ...आई ..........४


बाबा, आयुष्यभर कष्ट केलेत

कंटाळा नाही का ..? हो आला

कुटुंबासाठी उभा जन्म

आमच्या स्वाधीन केला ........५


बाबा, कुटुंबासाठी एवढे केले

खंत नव्हती का ..? मनाशी

आम्हा तुप - रोटी खाऊ घातले

स्वत: राहीलात उपाशी ............६


  - तानाजी धरणे

    महाड - रायगड

9975370912

  1. 1
  2. 2

लेखकाविषयी

तानाजी धरणे