जीव गुंतला तुझ्यात
जीव गुंतला तुझ्यात
जीव गुंतला तुझ्यात
कस समजावू त्याला
सांग ना मी तुझ्यावाचून कस
राहू माझ्या जगण्याला
तू दिसे मला अवतीभवती
माझा श्वास आहेस तू
अस अचानक बोलणं
नको सोडू तू
तुझी साथ मला अशीच
हवी आहे माझ्या जीवनात
तुला नको आहे का
मी तुझ्या जीवनात
काय माझी चूक झाली
तु मला सोडून गेला
सदैव सुखात रहा
हीच प्रार्थना त्या बाप्पाला
✍️ शब्द पालवी ✍️
सौ पल्लवी स्वप्निल ढवळे
इचलकरंजी, कोल्हापूर