फडकला तिरंगा देवूनिया बलिदान
फडकला तिरंगा देवूनिया बलिदान
फडकला तिरंगा देवूनिया बलिदान
फौजीला सलाम करायला उंचावते आमची मान
ज्या विरांनी सांडले रक्त
त्यांची आता आठवण फक्त
क्रांतिकारकांनी बलिदान देऊन
केला तिरंग्याचा सन्मान
जय जवान जय किसान
आता हिच आमुची शान
धन्य ती माता जिने देशासाठी
आपल्या मुलगा वेचला
देशाला स्वातंत्र्य मिळावे
म्हणून विर खचले
सगळीकडे बहरते आहे ही जन्मभूमी
फौजी नारा देतात आता हीच कर्मभूमी
विरांनी सांडला त्यांच्या रक्ताचा सडा
म्हणून शाबूत आहेत भारताच्या कडा
सर्व धर्म समभाव आता सगळेच बंधुभाव
थोर ते विर जे स्वातंत्र्यासाठी लढले
त्यांचे बलिदान व्यर्थ नाही गेले
आम्हाला त्या इंग्रजांच्या गुलामीतून मुक्त केले
✍️शब्द पालवी ✍️
सौ. पल्लवी स्वप्निल ढवळे
इचलकरंजी, कोल्हापूर.