story

तानाजी धरणे

विसरता न येणारे क्षण

****************************

  " विसरता न येणारे क्षण .....

   ~~~~~~~~~~~~


सन १९९२ साल उजाडले .मी इयत्ता दहावीमध्ये प्रवेश केला .तशी सातवीपासूनच जीवनाची ससेहोलपट सुरुच होती . दहावीचे वर्ष महत्वाचे म्हणुन मला नववीनंतर मुंबईला जाऊन कामदंधा करता आले नाही . कारण दरवर्षी उन्हाळ्याच्या सुट्टीत मी मुंबईला जाऊन भाजीचा दंधा करत असायचो .येनार्‍या पैशातून पुढचे ३/४ महिने बरे जायचे . परंतु नववी पास झाल्यानंतर लगेचच सर्वांनी दहावीचे तास लावले . हे पाहून मी हि शिरुरला उन्हाळी सुट्टीत व्हाॅकेशन तास लावला.आठ एक दिवस नियमित तासाला गेलो पण आंबळ्यावरुन शिरुरला जायला रोज दहा रुपये खर्च यायचा .तो आमच्या आवाक्याबाहेरचा होता .त्यामुळे मी आठ दिवसानंतर क्लास बंद केला व घरीच अभ्यास करु लागलो .त्यातच लागेल तेथे कामही करत होतो .

    त्या दिवशी मी व माझा मिञ अर्जुन साळुंखे आम्ही दोघे ' ढोंमखिळा ' येथे शेतात दगड गोळा करण्यासाठी मजुरीने गेलो होतो .एप्रिल महिना असावा , दुपारी ऊन मी म्हणत होतं .त्यात दगड खुपच तापलेले होते .आम्ही दोघेही दगड गोळा करुन मालक सांगेल त्याप्रमाणे बांधावर टाकत होतो .दुपारची वेळ होती .कामाने आम्ही दोघेही थकून गेलो होतो . दुपारी 2 च्या सुमारास माझी ' आई' धावत मला हाक मारत ढोंमखिळ्यात आली . व म्हणू लागली , बापु तुझ्या शाळेतुन पञ घेऊन शिपाई बाळु मदने आपल्या घरी आला होता .त्याने दिलेलं पञ मी वाचु लागलो ....

पञ मुख्याध्यापक श्री आवारी सरांचे होते पण त्यात संदर्भ संस्थेचे अध्यक्ष व माझी खासदार कै.प्रा रामकृष्ण मोरे साहेब यांच्या शिफारशिने माझी निवड पुणे येथिल ' गुणवत्तावाढ' वर्गासाठी झाली होती . पञ वाचुन माझ्या डोळ्यातुन अश्रु वाहू लागले. ज्या मुलांचे पालक सधन होते , त्यांची मुलं आधीच वेगवेगळ्या क्लासेसला जाॅईन होती .परंतु माझ्या घरच्या परिस्थितीमुळे मी कुठलाही क्लास जाॅईन करु शकत नव्हतो .त्यामुळे मला खुपच आनंद झाला .संस्थेच्या नामांकित " गुणवत्तावाढ " वर्गासाठी माझी निवड झाली याचा आनंद गगनात न मावनारा होता .

      या वर्गासाठी याआगोदरच माझे मिञ मिलिंद कोरेकर व इम्रान शेख या आगोदरच जाॅईन झाले होते. मी घरी गेलो , पुण्याला जायचे तर जवळ पैसे नव्हते .मी वस्तीत सर्वञ फिरलो माझा चुलतभाऊ कै. लहानु धरणे याने मला २५ रु दिले , माझे चुलतमामा शरद गुरुजी यांनी ५० रु व माझी आजी रेवूबाई धरणे यांनी २५ रु दिले. असे १०० रु घेऊन मी बाजारच्या पिशवीत एक चादर माझी काही कपडे पुस्तके घेऊन आनोसेवाडीवरुन भर ऊन्हात कर्ड्याच्या दिशेने निघालो . जाताना मला काहीच देता आले नाही म्हणुन आई वडीलांना खुप वाईट वाटले. कारण आण्णा म्हणजे माझे मोठे भाऊ सालगडीम्हणुन नगरला कामाला होते .

मी उन्हातच रस्त्याने पाई चालत होतो .अंतर 3 किमी होते . कर्ड्याजवळ आल्यावर माझ्या पाठीमागुन एक बाईकस्वार आला .मी हातकेल्यावर त्याने बाईक थांबवली व मला शाळेजवळ सोडले .

आत्ता संस्थेच्या क्लासला जायचे तर मला काहीच माहीत नव्हते .शाळेत गेलो तर शिपाई शिवाजी शिंदे काका व गुरुवर्य मिझ्या जीवनात सर्वोच्च स्थानी असलेले माझे सर श्री .सुभाष देशमुख सर भेटले त्यांनी मला एरंडवणा येथे कसे जायचे ते समजावून सांगितले . सरांचा आशिर्वाद घेऊन मी संध्याकाळी ७ वाजता विचारत विचारत संस्थेच्या कार्यालयात पोहचलो . तेथे गेलो तर बॅच सुरु होऊन ८ दिवस झाले होते . अभ्यासक्रम खुप शिकवुन झाला होता . तुला आत्ता काही उपयोग होनार नाही वगैरे म्हणुन बॅचप्रमुखांनी माझा हिरमुडच केला .बॅचप्रमुख खुयच कडक होते . परंतु मुख्याध्यापकांच्या पञावर संस्थेच्या अध्यक्षांचा संदर्भ असल्याने त्यांनी मला हजर करुन घेतले. व माझा दहावीचा अभ्यास सुरु झाला .या काळात मिञ मिलिंद व इम्रान या दोघांची मोलाची साथ भेटली व आपण एकटे आहोत असे कधीच वाटले नाही . राजुचे आई- बाबा व इमरानचे बाबा अधुन मधुन भेटायला येत होते . माझे आई - बाबा साधे होते पुणे त्यांना माहीत नव्हते. ते येवु शकत नव्हते पण , राजुचे आई-बाबा( कोरेकर सर ) भेटल्यावर मला माझेच आई - बाबा भेटल्याचा अनुभव यायचा . ऊन्हाळी सञ खुप छान झाले रेक्टर श्री बिडगर सर खुपच प्रेमळ होते.त्यांच्या सहवासात आमचे दिवस खूपच अविस्मरणीय गेले. त्याच सदरात सरांनी आम्हाला पुणे दर्शन दाखवले . शेवटी सर्व अभ्यासक्रमावर परीक्षाहोऊन मला ७२% टक्के भेटले तो निकाल आजही माझ्याकडे आहे. सरांचे पञ ही जतन करुन ठेवले आहे.

  दहावी झाल्यानंतर मी कृषि विद्यालय मांजरी फार्म येथे प्रवेश घेतला व तेंव्हा मोरे साहिबांनी विशेष पञाद्वारे सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले . ते पञही मी जपुन ठेवले आहे.

     दरम्यान जुनमध्ये शाळा सुरु झाली परंतु माझ्याकडे शैक्षणिक साहित्य नाही किंवा माझी परस्थिती नाजुक आहे हे आवारी सरांना माहित होते. त्यांनी मोरे साहिबांना सांगितल्यामुळे भाटीसरांच्या मदतीने व देशमुख सर पडवळ सर यांच्या सहकार्यामुळे व मोरेसाहेबांनी शब्द टाकल्यामुळे दहावीचे सर्व शैक्षणिक साहित्य , कपडे हे सर्व मला भवरीलाल सराफ शिरुर यांनी दिले. माझी गुणवत्तावाढ वर्गाची व मेसची फी सुद्धा मोरेसाहिबांनी भरली .खरच मी स्वत:ला खुप भाग्यवान समजतो की मला जीवनात अशी देव माणसं भेटली . हे सर्व झाल्याने मला खुप भरुन आले, व आपण या संधिचा फायदा घेऊन जीवनात काहीतरी चांगले करुन या परिस्थितीवर मात करण्याचा मी संकल्प केला.

     माझ्या पडत्या काळात देवाप्रमाणे धाऊन येणारे शिक्षक मला भेटले त्यामध्ये विशेष आवारी सर , डुबेसर , देशमुखसर , गाढवेसर , दुर्गेसर , कोरेकर सर , वाळुंजसर , आवारीमॅडम , घाडगेमॅडम , व्हावळसर , गोंदकरमॅडम , पटेलसर , पाखरेसर व ज्यांनी ज्यांनी मदत केली ते सर्व मिञमंडळी या सर्वांचा मी खुप खुप ऋणी आहे .

     या सर्वांच्या सहकार्यामुळे व प्रोत्साहनामुळे मी माझ्या जीवनात यशस्वी झालो . माझे कुटुंबिय काबाडकष्ट करणारे होते परंतु त्यांच्या कष्टामुळं व जिद्द चिकाटी या गुणांमुळं माझं जीवन सुखकर झालं असं मला वाटतं .....


   ✍? - तानाजी धरणे

        महाड , रायगड

      दि. 26/8/2021

9975370912

  1. 1
  2. 2

लेखकाविषयी

तानाजी धरणे