मैत्रबंध
*#मैत्रबंध*
श्वेता , ऐक ना ! आज भेटशील का मला ? आपल्या नेहमीच्या कट्ट्यावर - इति प्रीती !
ओ मॅडम , मी पण येऊ का ? - - शुभम तू ..? तू कधी आलास टूरवरून !
....का...का ग ? तुमच्या भेटीत मी व्यत्यय आणलाय का कधी ? मला ही सांगत जा ना कधीतरी तुमची गुपितं !
शुभम ...चावटपणा बास कर हा आता ! तू श्वेता ला फोन दे बघू !
मॅडम ...तुमच्या मैत्रिणीचा कॉल - इति शुभम ! ...हॅलो ! कुठं होतीस ग ? ऐन मोक्याच्या क्षणी नेमका शुभम कॉल वर ! त्याला काय सांगू , म्हणून माझी त्रेधातिरपीट उडते...बरं ते जाऊ दे ! श्वेता आज आपण भेटूया का ? जशी तुझी आज्ञा ...इति श्वेता !
बसं हा श्वेता , आज तुझी कळी खुलली का ? शुभम आलाय टूरवरून म्हणून , तुम्हाला डिस्टर्ब नको असेल तर , नंतर भेटूया आपण...!
ओ नो डिअर..! तो आज इव्ह ला एका मैत्रिणीची Bday पार्टी आहे म्हणून त्याच्या बॅडमिंटन क्लब मध्ये जाणार आहे आणि रात्री उशिरा घरी येणार ! अशी तशी मी आज सायंकाळी फ्री च होते . बरं झालं तू हा भेटीचा प्लॅन केलास . मस्तपैकी भेटून आता आपण डीनरला बाहेरच जाऊया ! ...OK , Bye See You Later !
श्वेता , प्रीती , शुभम तिघेही एकाच सोसायटीतील बचपन के दोस्त ! या तिघांच्या कंपूत आणखी एक जण होता मितेश ! पण त्याच्या बाबांची ट्रान्सफर झाल्याने तो बडोदा व नंतर पुढे बदलीच्या ठिकाणी फिरत राहिला . नंतर जो तो आपापल्या करिअर मध्ये व्यस्त झाल्याने , आपल्या मार्गाने गेले . श्वेता , शुभमची लव्ह बर्डस जोडी विवाहबंधनात अडकली .
त्यांच्या लग्नात सगळ्या मित्रमैत्रिणींनी धमाल उडवली . शाळेपर्यंत हे सगळे एकत्र होते नंतर करिअर च्या वाटा चोखळत सर्वांचे मार्ग वेगळे झाले पण अधून मधून एकमेकांना भेटत होते .
प्रीती पण संसारात रमली , म्हणता म्हणता लग्नाला अठरा वर्षे उलटली . आत्तापर्यंत जीवन कसं सुरळीत चालले होते , पण आत्ताच तिच्या मनाची अशी द्विधा अवस्था का झाली ? श्वेता पण तिची मनस्थिती जाणून होती , तिला कळत नव्हतं ...असं काय घडलं असेल पुन्हा ती डिस्टर्ब व्हावी .
इकडे प्रीती ला पण श्वेताला कधी एकदा भेटून मनमोकळे करते असे झाले होते . सायंकाळी सहा वाजता दोघी समोरासमोर आल्या . तसा प्रीती चा गळा दाटून आला . श्वेता ला न विचारताही तिच्या मुकवेदना चा अर्थ गवसला ! का अशीे वागते ही ?
प्रीती शांत हो आधी . आणि मला सांग काय झालं नक्की पुन्हा तुमच्यात ? श्वेता माझा नवरा खरंच खूप प्रेमळ ग , मला समजून घेतोय म्हणून तर मी आपल्या मित्रमैत्रिणीत बिनधास्त वावरू शकते ...पण मला त्याला फसवायचं नाही ! मी त्याच्यापासून काहीही लपवत नाही , किंबहुना आम्हा दोघांचे ही कॉमन मित्र मैत्रिणी आहेत आम्ही आमची स्पेस राखतो , एकमेकांना छान ओळखतो , स्त्री भोवताली असलेली समाजाची चौकट मला ओलांडायची नाही आणि म्हणूनच मला यातून बाहेर पडायचंय !
का आणि का ...हा मितेश मधेच उगवला माझ्या आयुष्यात ! आणि मी ही अशी कशी त्याच्या मैत्रीत गुंतत गेले ...!
होती त्याची आपल्याशी मैत्री होती तर इतके दिवस कुठं होता हा ?
प्रीती शांत हो आधी आणि मी काय म्हणते ते नीट ऐक , आणि वेळीच सावर स्वतःला नाहीतर नंतर पश्चातापाची वेळ येईल .
मितेशच्या आयुष्याची कहाणी हा त्याचा इमोशनल ड्रामा आहे . आपल्या फसलेल्या प्रेमाची कहाणी तो तुला सांगून तुझ्या कडून सिपंथी मिळवतोय , हे तुझ्या लक्षात कसं येत नाही ! ....तुझ्यासारखी समजून घेणारी , त्याच्या पाठीशी ठामपणे उभी राहणारी मैत्रीण त्याला इतक्या वर्षानंतर भेटली , मग तो तुझी मैत्री का तोडेल ?
पण जरा आठवून बघ , त्याची आपल्याशी इतकी मैत्री होती तर इतक्या वर्षात त्यानं तुझ्याशी , माझ्याशी आपल्या इतर मित्रांशी संपर्क का साधला नाही . अग थोडी शहाणी हो ! आता तुझी मुलं मोठी झालीत , त्यांच्या भवितव्याकडे बघ जरा ! तुझ्या मनातील चलबिचल कळतेय मला !
तुझ्या नवऱ्याच्या अबोल , स्थितप्रज्ञ स्वभावामुळे तू त्याच्याशी सगळं शेअर करू शकत नाहीस कारण त्याच्याबद्दल विश्वास असला तरी काही नाती गमावून बसू...ह्याला तू घाबरतेस ! तुझ्या मनातील घुसमट मोकळी व्हावी . आपलं कोणीतरी ऐकणार असावं असं वाटतं तुला . आणि म्हणूनच तुला मितेश शी मैत्री आवडते . त्याच्याशी तू सगळं शेअर करू शकतेस आयुष्यात काही कारणाने त्याने लग्न न करण्याचा निश्चय केला पण त्याला जे हवंय ते त्यानं ऑलरेडी मिळवलंय तो एका प्रेमात फसला ..! म्हणून त्याने लग्न नसेल केलं , हा त्याचा निर्णय आहे . त्याचे ठिकठिकाणी अनेक गाण्याचे प्रोग्रॅम होतात . त्याचे फॅन्स फॉलोअर्स खूप आहेत . तो एक प्रोफेशनल सिंगर आहे . त्याच्या दर्दभरी गाण्यावर तू फिदा आहेस आणि त्याचा संबंध तू...तो नाराज आहे आयुष्यात असं मुळीच लावू नकोस . तो त्याचं लाईफ छान एन्जॉय करतोय आणि तो एक कलावंत आहे . त्याच्या जीवनात कोण येतं कोण नाही , त्याने कोणाशी लग्न करावं ..., यात ढवळाढवळ करण्याचा तुझा हक्क नाहीये !
आपली मैत्री अगदी निर्लेप आहे आणि अशीच शेवटपर्यंत राहू दे ! समाज कितीही पुढारलेला असू दे पण लग्न झालेल्या स्त्री चा एक पुरुष मित्र ह्या कडे बघण्याचा त्यांचा दृष्टिकोन अजूनही बदलत नाही . पूर्वीच्या काळात राधा कृष्णाच्या मैत्रीला ही असाच डाग लावला पण समाजावर मात करून त्यांची मैत्री टिकली आणि ती अजरामर झाली , पण म्हणून आपण काही राधा बनू शकत नाही , मोठ्या पदावर काम करणाऱ्या स्त्रिया ही ह्या गॉसिप मधून सुटल्या नाहीत , फक्त आपण कोणाकडे किती लक्ष द्यायचे हे आपण आपली लक्ष्मणरेषा ठरवून वागायचं इतकंच !
वाद झाला की मैत्रीत ब्रेकअप ...हे असं किती दिवस करणार आहात ? मितेश मला भेटू दे , मी तर त्याचा कान पकडून त्याला जाब विचारणार आहेच , पण त्या आधी तुला एक मैत्रीण , स्त्री म्हणून थोडी जाणीव करून देतेय ! तू एक आई पत्नी , सून आहेस ह्याचे भान ठेवून वाग !
श्वेता ...I am Sorry ! Really Sorry ! मला कळतंय पण वळत नाही , मला माझा मित्र , आपली मैत्री गमवायची नाही , कुटुंबातील वातावरण आनंदी असायला हवं , का म्हणून इतरांपायी घरात वाद , चिडचिड निर्माण करायची पण आमच्यात हल्ली कायम वाद होताहेत . आमची मैत्री ही एक वैचारिक पातळी चे एक बॉंडिंग आहे , भावनिक नात्याच्या रेशीमगाठी ह्या मैत्रीच्या ऋणानुबंधात गुंफल्या गेल्यात . ह्यात कसलं ही शारीरिक आकर्षण किंवा ओढ नाही तर मैत्रीत फक्त एकमेकांबद्दल ची आपली आपुलकी माया , प्रेम इतकंच सीमित असावं तरच मैत्री टिकते .
प्रीती , एक लक्षात ठेव हे ब्रेकअप म्हणजे काय नवरा - बायको , प्रियकर - प्रेयसी च्या नात्यातले नाही ! तर मैत्रीतील ब्रेकअप हे फार काळ टिकत नाही . त्यात आडवा येतो इगो ! माघार कोणी घ्यावी , ह्यावर गाडी अडते . आणि एक कायम लक्षात ठेव....!
आपल्या मैत्रीची पारख करताना स्वतःच्या नजरेने पारखावे . दुसऱ्याने दिलेला चष्मा घालून पारखल्यास , नात्यात वितुष्ट येते. आपल्याला चूक ही नेहमी दुसऱ्याची दिसते. स्वतःची कधी दिसत नाही आपल्या पाठीसारखी !
मैत्री स्वीकारताना ती नेहमी समोरच्या व्यक्तीच्या गुणदोषासकट स्वीकारावी म्हणजे मैत्रीत ब्रेकअप होत नाही . मग ती मैत्री कोणाशी ही असू दे ! नेहमी मी ...आणि माझं करत बसलीस तर नाती दुरावतात . शिवाय आपल्या सारख्या लग्न झालेल्या स्त्रियांवर अनेक जबाबदाऱ्या असतात त्या पार पाडत मैत्रबंध जपायचे असतात . पुस्तकातील गणित आणि प्रत्यक्ष जीवनातील गणित ह्यात खूप फरक आहे . म्हणूनच स्वतःचे गणित स्वतः सोडवत आनंदाचे उत्तर मिळवावे लागते आणि हाच नियम मैत्रीत ही लागू असतो .
मैत्रीच्या आठवणी ह्या मनाच्या एका कप्प्यात जपाव्यात . आधाराला हाच मैत्रीचा हात पुढे येतो . प्रीती ...ह्या वयात कसलं ग , तुमचं नातं त्या Tom & Jerry सारखं !
वाद झाला की बसले फुगून ....मी आणि शुभम तर तुम्हा दोघांना खूप हसतो .
मितेश सारखा मित्र तुझ्यावर भरभरून मैत्रीप्रेम करतो ...अर्थात वास्तव्याची जाणीव तुम्ही दोघेही ठेवता , कुठे ही स्वतःची पायरी घसरू न देता ! त्याने आयुष्यात खूप काही गमावलयं , आई वडिलांच्या अकाली मृत्यूनंतर तो आता कुठे सावरतोय , त्याची बहीण संसारात रममाण ! ...तर प्लीज त्याला समजून घे. त्याला जमेल तशी मदत कर . आधाराचा हात दे , पण अजून त्याला दुःखी करू नकोस ! आम्ही ही तुझ्या बरोबर आहोतच. आधीतर वेदनांचे ओझे खांद्यावर बाळगत समोरच्याला ही तो खुश ठेवतो . आयुष्याला आनंदाने सामोरे जातोय ! त्याच्या आनंदात सहभागी हो , दुःखात भार हलका कर तरंच तुमची ही मैत्री खरी मानता येईल...! रिअल मैत्री असेल तर कोणी कोणावर कुरघोडी करूच शकत नाही आणि मैत्रीत प्रत्येकाला स्वतःची अशी स्पेस जपता यायला हवी.
इतक्यात प्रीती चा सेल वाजला ...तिच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून श्वेता गालातल्या गालात हसली .. Hello ! My Sweet Heart ! How are you ? ...आत्ता कुठे आहेस - इति मितेश !
ए मंद ...तुला रे काय करायचं ! मी कुठं का असेना ....अरे कूल कूल ! मी पण जॉईन होऊ का तुम्हाला ? मला भेटायचं तुला ...प्रीतीच्या चेहऱ्यावरची कळी खुलली ....श्वेता तिचं निरीक्षण करत होती . इतक्यात मितेश त्यांच्या पुढ्यात हजर झाला . त्याला अचानक तिथे पाहून प्रीती ओरडली ...!
म्हणजे श्वेता..You Too !
श्वेता , मितेश एकमेकांच्या हातावर टाळी देत हास्यात रमले .
प्रीती कायम लक्षात ठेव आता ...!
नातं तेच टिकतं , ज्यात शब्द कमी आणि समज जास्त !
तक्रार कमी आणि प्रेम जास्त !
अपेक्षा कमी आणि विश्वास जास्त असतो...!!
????????
©️®️ सौ राजश्री भावार्थी
पुणे