माता दुर्गा ...
माता दुर्गा ...
जय माता तु, दुर्गा तु
जगी किर्ती गं महान
माॅ दूर्गेचे नाव मुखी
मिटे मनातील तहान ..!,
येता संकट जीवनी 'माता '
तूच आम्हा तारणार
अंबा तू चंडीका तू
असुरोंचा फडशा गं करणारं ....!!
माझ्या जीवणी गं माता
असो तुझीच कृपा
कर सांभाळ या दुनियेचा
नको गं अवकृपा ...........!!!
माॅ अंबेची छाया तुझी
आम्हा भक्तांचा प्रसाद
शरण तुझला आलो आता
घे आम्हा पदरात .........!!!!
माॅ आंबेचा महिमा भारी
चराचरात तुझीच गं शान
साडीचोळीने ओटी भरतो
घे पदरात भक्ताचा गं मानं .....!!!!!
आई आंबेची आराधना गं
नवरत्नात घरोघरी करतो
तुझी स्थापना करुनी मी गं
मळवट माता तुझ्या नामाचा भरतो ...!!!!!!
✍️ तानाजी धरणे
महाड , रायगड
9975370912