व्यथा
व्येथा
खुप झाल्या योजना " भाऊ "
आत्ता घाम फुटाया लागला
भला माणूस " ग्रामसेवकभाऊ "
तुझा भी तोल सुटाया लागला .....!
घरपट्टी , पाणीपट्टी ....बा
जन्ममृत्य नित्याचे ..
आली आँनलाईन कामे ही
डोकं फुटतय हाक्काचे ......!!
लोकविकासाचा ' दुवा ' तु
ओझ्याखाली रे.. दबलेला
एक एक कोडे सुटताना..
माणसातला माणुसपण शिनलेला ..!!!
कामाची यादी मोठी
भोवळ येते रे मनाला
ग्रामविकासाचा " कणा " तु
पाईक हा जनतेला ........!!!!
दु:ख जाणावे कुणी हे
मापक ईच्छा ही जनाशी
लोकविकासाचा गाडा ओढतो
कदर करावी " ग्रामसेवक " मनाची ..!!!!!
✍️ तानाजी धरणे
महाड, रायगड
13/10/2021