तुझं असणं माझं अस्तित्व
तुझं दिसणं तुझं हसणं
मनाला वेड लावून गेलं
तू माझ्या आयुष्यात आलास न्
माझं आयुष्य बहरुन गेलं
आयुष्यात अनोळखी आलास बनून
माझं अस्तित्व गेलास बनून
तु असचं रहा माझ्या आयुष्यात
एक माझ्या जगण्याचं कारण बनून
तुझ्या माझ्या प्रेमाची चर्चा आहे चोहीकडे
आता कोणी करू शकत नाही आपले वाकडे
तुझ्या भेटीसाठी झाली मी आतुर
असे करु नको तुझ्यापासून दूर
तुझ्या मिठीत हरवून जायचं
आपल्या प्रेमाची वेल चढवत जायचं
तुझ्या सुखदुःखात मला सामावून जायचं
माझ आयुष्य तुझ्यासोबत व्यतीत करायचं
तुझ्याशिवाय मला नाही करमत
तुझ्याशिवाय जगणं कल्पना नाही करु शकत
तु नसता जवळ माझ्या होतो तुझा भास
तुझ्या ओढीची लागली या मनाला आस
✍️ शब्द पालवी ✍️