poetry

सपना अंभोरे

बायको ?

प्रेमाने वागते सर्वांशी, सर्वांशी आपुलकीने राहते

दुखावत नाही मन कुणाचे इतके छान नाते ती जपते

आई बाबा मित्र मैत्रिणी सोडून ती आता तुझ्या घरी राहते

स्वतःची स्वप्ने बाजूला ठेवून ती फक्त तुझ्यासाठी वाहते

अश्या तुझ्या प्रेमळ पत्नीसाठी तू स्वतःला बदलून घे 

भाजीत मीठ नसले तरी हसून वेळ मारून घे

तिने बनवलेल्या स्वयंपाकाला कधी तरी कौतुक भरले शब्द दे

साडी छान शोभतेय आज अशी मनमोकळी दाद दे

सुट्टीत एखाद्या एकटीलाच आपणहून फिरायला ने

मुलगीच समजून हट्ट एखादा तूच जरा समजून घे

वाढदिवस नसताना ही तिला प्रेझेंट चा धक्का दे

वादात स्वर उंचवताच शांतपणे ऐकून घे

पुरुषप्रधान संस्कृती सोडून माणूसपणाला थारा दे

झोपताना थोपटून तिला आधाराची कुशी दे

जमलेच तर सुरात गुणगुणुन स्वप्नांची मोकळीक दे

हातात हात घेतला लग्नात, आता खरी साथ दे

नवरेपणा दूर टाकून विसावायला प्रेमळ खांदा दे

अशी काहीशी साथ दे तिला तुझ्या प्रेमाचा हात दे

  1. 1
  2. 2

लेखकाविषयी

सपना अंभोरे