poetry

सपना अंभोरे

भाऊ ♥️

भाऊ फार खोडकर असतो,

लहापणापासून वारंवार भांडतो,

सारखे सारखे बहिणीला त्रास देतो,

नेहमी बहिणीला रडवत असतो,

प्रत्येक वेळेस चिडवतो,

"एकदा तू गेली की आमची सुटका होईल", 

असं म्हणून नेहमी हसत असतो,

पण ताई आपल्यापासून दूर जाईल 

ह्या विचाराने तो ही रडत असतो,

बहिणीच्या लग्नात भाऊ राब राब राबत असतो,

भाऊ असाच असतो, 

आपल्या जवळ असला की डोक खराब करतो, 

आणि दूर गेलो की अश्रूंनी ओला होतो,

भाऊ वेडा जरी असला तरी 

बहिणीला तो जपत च असतो,

भाऊ कसा ही असो,

प्रत्येक बहिणीला तो लाडाचा च असतो. 

              - सपना अंभोरे ?

  1. 1
  2. 2

लेखकाविषयी

सपना अंभोरे