article

राजश्री भावार्थी

जागतिक *लेफ्ट हँडर्स* डे


आज १३ ऑगस्ट

हा दिवस जागतिक "लेफ्ट हँडर्स डे " म्हणून साजरा केला जातो ....त्या निमित्ताने ....खरे तर मला हे डावखुरे लोक एखाद्या जादूगारासारखे भासतात . त्यांच्या हालचाली खूप चपळ असतात . प्रत्येक डावऱ्यांचे काही तरी खास असे वैशिष्ट्य असते ....

त्यांच्यात उपजत एखादी कला असते

पण त्या कलेला खतपाणी घालायचे काम त्यांच्या पालकांनी बालपणी करायला हवे . तरच ते नैपुण्य कौशल्य बनतील !


माझ्याच मुलाची गोष्ट सांगते ....नऊ महिने पोटात वाढविलेला गोळा बाळंतपणानंतर अलगद कुशीत विसावला ....मी ही आई च्या ममतेने त्याचे गोरेपान रूप न्याहाळत होते . जणू काही माझीच नजर लागेल का ?...

या विचाराने क्षणभर बावरून गेले . एवढ्या कळा सोसल्यावर , छोट्या बाळाच्या बाललीला पाहून भारावून गेलेली ! ...पण का कोणास ठाऊक त्याच्या हालचालीत एक वेगळेपणा दिसून येत होता ...!

माझा मुलगा फक्त डावा च हात सारखा उचलायचा ! पहिल्या तीन दिवसातच मला समजून चुकले की हा Lefty आहे ....!

डॉक्टरांकडून खात्री झाली . तसा मी निर्णय घेतला , त्याला हवे तसेच करू द्यायचे ! माझ्या सासरची लोक कट्टर दशग्रंथी

....घराण्यात सासरी माहेरी कोणीही डावखुरे नाही ......!

घरच्या लोकांनी त्याच्या सवयी बदल म्हणून खूप सूचना दिल्या . पण मी डॉक्टरांच्या सूचनेचे पालन केले . ...जर आपण त्यांच्या प्रगतीत बाधा आणली तर त्यांची वाढ खुंटते....मूल संभ्रमात पडते ....!


आज जगातील अनेक नामांकित लोक lefty आहेत . राफेल नादाल , मार्टिन नवरतिलोव्हा

अॅलन बॉर्डर , गॅरी , सोबर्स , चार्ली चॅप्लिन पासून महात्मा गांधी , फिडेल कॅस्ट्रो , आईनस्टाईन , बिल क्लिंटन , जॉर्ज बुश , तेंडुलकर , अमिताभ

.....अनेक दिग्गज या पंक्तीत आपल्या क्षेत्रात नावलौकिक मिळवून आहेत किंबहुना डावरे हे उजव्यापेक्षा बऱ्याच बाबतीत वरचढ असतात !! त्यांची वेगळी शैली असते . अनेकदा ते confuse झालेले दिसतात . पण त्यांचा स्वतःचा आत्मविश्वास जबरदस्त असतो .


डावऱ्या लोकांबद्दल अनेक गैरसमज आहेत . अजूनही आपल्याकडे डाव्या हाताने कोणतीही कृती करणे अशुभ मानले जाते ....पण आपण वेगळा विचार केला तर ती त्यांची सवय म्हणून सोडून द्यायचे !


बालपणी मूल डावरे आहे हे लक्षात

आल्यावर अनेकांनी आपल्या मुलांचा हात बांधून ठेव ! असे अनेक उपाय केले ...पण वैद्यकीय दृष्ट्या हे पूर्णपणे चुकीचे आहे !! अशाने त्यांच्या व्यक्तिमत्त्व विकास , प्रगती खुंटते !


वास्तविक डावखुरी माणसे ईतरांपेक्षा काहीतरी वेगळे , सरस कामे करतात . एका जागतिक सर्वेक्षणात असे समजले की , डावरे लोक अधिक चाणाक्ष , कलात्मक सर्जनशील , संवेदनशील असतात . त्यांचा बुद्ध्यांक ही खूप छान असतो . अनेक उपकरणे हाताळताना त्यांचा कस लागतो . तरीही डावरे लोक न डगमगता त्यावर मात करतात !

तर मंडळी चला !

आज आपल्या ओळखीच्या डावऱ्यांचे हसतमुखाने स्वागत करूया ! त्यांचे खास अभिनंदन आजच्या दिवशी करूया !


Happy Left Handers day !!



©️सौ राजश्री भावार्थी

पुणे


  1. 1
  2. 2

लेखकाविषयी

राजश्री भावार्थी