2026
अर्पण. तिच्या अस्तित्वाचा लढा
अर्पण. तिच्या अस्तित्वाचा लढा
ही कहाणी सांगण्याच्या आधी सूचना ही कहाणी सत्य घटनेवर आधारित आहे तर शहरातील गजबजलेल्या रस्त्यावरून एक आलिशान Mercedes-Benz जात होती. बाहेर गर्दी होती आसपास अंगरक्षकांची फौज होती बाहेरची गर्दी त्या गाडी कडे बघून हात दाखवत व काही लोक कॅमेरा धरून गाडीच्या आत बसलेल्या व्यक्तीचं नाव घेत होते मी हे सगळ बघत होते ऐकत होते त्या गाडीच्या मागच्या सीटवर बसलेली मी मागच्या सीटवर बसलेली मी त्या दिवशी खरंच स्वतःचा खूप अभिमान वाटत होता मी कोण आहे याचे अचानक जाणीव व्हायला लागली होती जिथे मला कोणी हातही लावू शकत नाही हे सगळं मी अनुभवच घेत होते की अचानक
माझी लक्ष एका मंदिराकडे गेले आणि पुन्हा तेच सगळं आठवलं स्वतःला कितीही म्हटलं की नाही आठवायचं तरीही “काही जखमा काळाबरोबर भरून येतात, पण काही आठवणी आयुष्यभर पाठलाग करत राहतात. याच गोष्टीचा विचार करत होते आणि त्याच मंदिरा बाहेर मला गजरे बनवणाऱ्या एका लहान मुलागी दिसली आणि मग अचानक मला आठवलं की मी कोणी आहे याच विचारत होते की तितके आहेत मला माझ्या असिस्टंट नि हाक मारली
मी विचारांच्या तंद्रीतून बाहेर येत म्हणले “बोल “ तो म्हणाला “बाई हे बघा आल आकाशवाणीचे रेडिओ केंद्र” गाडी गेटमधून आत गेली आणि मी गाडीतून खाली उतरून वरती इमारतीच्या आत गेली. माझ्यासोबतच्या अंगरक्षकांना थांबवून मी पुढे आत मध्ये खोलीत गेले
एक छोटंसं कार्यालय होतं. कार्यालया बाहेर लिहिलं होतं आकाशवाणी रेडिओ केंद्र मुंबई त्या कार्यालयाच्या आत मी गेली. त्या कार्यालयामध्ये एक बाई म्हणजे रेडिओ जॉकी ती तिने माझं स्वागत केलं या बसा की आणि मग पुढे त्या रेडिओवर आमची मुलाखत सुरू झाली ती बाई म्हणजे अर्थात सुप्रसिद्ध रेडिओ जॉकी अनुराधा पुढे आली आणि ती म्हणाली, तीन मुलाखत सुरू केली ”रेणुका बाई तुमचं खूप खूप स्वागत आहे आमच्या या आकाशवाणी केंद्र मध्ये आज हजारो चहाते तुम्हाला ऐकत असतील पण आज आम्हाला या सुप्रसिद्ध गायकीचा मागचा प्रवास ऐकायचा आहे तुमची कहाणी ऐकायची तुम्ही कोण होता ते ऐकायचे
कसा होता तुमचा प्रवास एका छोट्या गावातून आल्या आणि आज इतक्या मोठ्या गायिका झाल्या , सगळे लोक तुमच्याकडून प्रेरणा घेतात. पण मला तुमचा आधीचं रूप जाणून घ्यायचं. तुम्ही लहानपणी कशा होतात? तुमचं गायकीच्या क्षेत्रात पदार्पण करण्याच्या अगोदरच आयुष्य कसं होतं हे मला जाणून घ्यायचं. मी सांगायला सुरुवात केली. त्याअगोदर माझ्या डोळ्यात त्या आठवणी तरळून गेल्या होत्या. तर मी सांगायला सुरुवात केली महाराष्ट्र कर्नाटक सीमेवरती तशी अनेक गावं. त्यातलं एक महत्त्वाचं गाव म्हणजे सौंदत्ती. या गावाला आहे रेणुका यल्लमा देवीचा केंद्रस्थानच म्हणतात अगदी छोटासा गाव किंवा अगदी पाडाच म्हणा, चारी बाजूंनी निसर्गाने
वेढलेला होता. गावाची रचना सांगायची झाली तर गावाला दोन आळी होत्या. एक खालची आळी एक वरची आळी. खालच्या आळीमध्ये काही घरं होती आणि वरच्या आळीमध्ये काही घरं होती. घरांमध्ये अंतर भरपूर होतं. त्याच गावाच्या मधोमध एक भलं मोठं मंदिर उभं होतं. मंदिर खूप सुंदर होतं. ते मंदिर होतं रेणुका यल्लम्मा देवीचं. दर मागी पौर्णिमेला तिथे मोठी यात्रा भरायची.
सगळे मुंबईला गेलेले कामगार लोक त्या दिवशी परत यायचे गावात. असं ते सुंदर मंदिर आश्या तुरळक लोकवस्तीमध्ये मी राहत होती माझ अगदी छोटंसं घर. त्याला कौलारू छत. आतमध्ये एक वरांडा, एक छोटी खोली आणि एक स्वयंपाक घर. इतकं साधं त्यांचं घर.
माझे वडील शेतकरी होते. व ते शेती करत होते. माझी आई घरीच असायची. माझ्या घरी तिची आजी आजोबा आणि माझा लहान भाऊही होता. असं सगळं पाच लोकांचं ते सुखी कुटुंब. त्यात तिला मित्र-मैत्रिणी भरपूर होते. आसपासचे सगळे मित्र-मैत्रिणी तिच्याबरोबर खेळत असत. रेनुकाचा स्वभाव हा अगदी मनमिळाऊ होता. व ती गावात सगळ्यात सुंदर दिसत होती. तिचा स्वभाव म्हणजे अगदी गोड,
अगदी लोकांना पहिल्या क्षणी मोहित करेल असा. तिचे आई-वडील फार काही श्रीमंत नव्हते. पण जसे होते तशात त्यांनी अगदी सुखात त्यांच्या मुलीला वाढवलं होतं अशाचच त्या वर्षी त्या गावाला श्राप लागला. गावामध्ये अचानक भरपूर दुष्काळ पडला. पाऊस नाही, पिकाला भाव नाही, मोल नाही. त्याच्यामुळे शेतकऱ्यांच्या घरची भाकरी होत नव्हती. यामुळे त्या गावातली काही लोकं गाव सोडून जायला लागली.
कारण गावात काही उरलेच नव्हतं. त्यातच तिच्या खूप जवळीचा खूप सखा मित्र गाव सोडून निघून गेला. तिला खूप वाईट वाटल ह्याच दुःखात ती जेव्हा घरी आली तेव्हा तिच्यावरती अजूनच एक मोठा संकट येणार होतं. त्याची तिल्या चाहूलही नव्हती. तिच्या आजी आजोब्यांची झालेला अकाली मृत्यू आणि वडिलांनी केलेली आत्महत्या अशी घरामध्ये एका पाठोपाठ होणारे तीन मृत्यू, आर्थिक संकट आणि खायला आणणं नाही, या सगळ्या भीतीने तिच्या आईला झोप लागत नव्हती. म्हणून तिने त्या गावातल्या त्या मंदिराच्या पुजाऱ्याकडे जायचं निर्णय घेतला. त्याने तिला जाऊन विचारलं “की माझ्या घराला कुठला अपश्राप लागणार?
माझ्या घरामध्ये मृत्यू होतात. मला माझ्या मुलाची काळजी. आहे मला माझ्या मुलाचा जीव सर्वात महत्त्वाचा” पुजाऱ्याला इकडे संधी दिसली. आणि त्याने जस इतर मुलींबरोबर केल तेच त्याने माझ्या बरोबर केल माझ्या आईला सांगितलं की “याच्यावरती एकच उपाय आहे. तुम्ही तुमच्या मुलीला देवदासी बनवा. हो, देवदासी. देवदासी म्हणजे इतकी क्रूर परंपरा, ज्यात आपल्या मुलीला देवाला तान करून टाकतात. तिला मंदिरात राहावं लागतं, तिला प्रसाद खावा लागतो आणि तिचे घरचे तिच्याकडे परत बघतही नाहीत.” सुरुवातीला तिच्या आईनी नको, असा विचार केला.
पण नंतर मुलाच्या काळजीने तिने हो म्हंटलं. आणि तिने ठरवलं की तिच्या मुलीला देवदासी बनवून ती गाव कायमच सोडून शहरात निघून जाईल. आईने येत्या माघी पौर्णिमेच्या दिवशी मला माळा, चांगले कपडे घालून तिने पूजा करून देवाला अर्पण केलं. आणि मला सोडून गेली मी जातो ना खूप रडत होती तिच्याकडे पण तुम्ही एकदा माझ्याकडे वळून बघितलं नाही लाज वाटत असावी का तिला का पश्चाताप…. मला तर कळतही नव्हतं की माझ्याबरोबर काय होतंय. मला देवदासी बनवून आई आणि माझा भाऊ गाव सोडून निघून गेले
मला खूप भीती वाटत होती की आता पुढे काय होणार होतं. मी त्या मंदिराच्या आत गेले. तिथे पुजारी आणि त्या मंदिराचे काही विश्वस्थ लोक बसले होते. त्यांच्यात काहीतरी माझ्यावरूनच चर्चा सुरू होती. मग तिथेच राहायला लागले. तिथेच जेवायला लागले. आणि काही वेळानंतर त्या पुजाऱ्यांचं आणि त्या विश्वस्थ मंडळांचं वागणं माझ्याबद्दल
बदललं. एका रात्री मी पाणी आणायला चालले होते. तेव्हा त्यांनी माझा हात पकडला. सतत ते माझा हात पकडत होते, माझ्या जवळ येत होते. पण मी त्यांना स्वतःपासून लांब ठेवायचा प्रयत्न करत होते. त्या रात्री त्यांनी माझा हात पकडला आणि माझ्यासोबत मला एका खोलीत नेऊन सगळ्यांनी मिळून माझ्यासोबत शारीरिक छळ केला माझा. ती रात्र मी आजपर्यंत विसरू शकले नाही. त्या रात्रीनंतर माझा आयुष्य खूप बदललं. मला सतत त्या रात्रीची भीती वाटायला लागली. मला त्या लोकांची भीती वाटायला लागली. मला माझ्या आईचा राग येऊ लागला. पण कळतही नव्हतं की ती कुठे.
कारण मी सगळ्यांना विचारलं. ती गावात नव्हती. मग मी ठरवलं की मी शांत नाही बसणार. मी हे सगळ्या गावकऱ्यांना जाऊन सांगणार. मी गावकऱ्यांना सांगायचा प्रयत्न केला, ओरडून ओरडून सांगायचा प्रयत्न केल मला वाटलं मी खरी आहे सगळ्यांना माझ्यावर विश्वास बसेल पण मी एक गोष्ट विसरले होते की असत्याकडे ताकद होती सत्ता होती त्यापुढे शेवटी माझं सत्य हरलंआणि तेच झाल कुणी माझ्यावरते विश्वासच नाही ठेवला. वर ते पुजाऱ्यांना त्याने मला खोटं पाडावं म्हणून गागा भट्ट. त्याने मला खोटं पाडावं म्हणून मला दायंट ठरवलं. आणि मला मंदिरातून हाकलून दिलं. मी जंगलात राहायला लागले. कारण मला गावात येऊ सुद्धा द्यायचे नाही
मला वेशीपर्यंत येण्याची परवानगी होती मी गावाच्या वेशीबाहेरच्या जंगलात तिथेच माझा कसा तसा उदरनिर्वाह करायला लागले. एकदा मी गावामध्ये जेवण मागायला आले. तेव्हा गावामध्ये खूप गर्दी होती. त्या गर्दीतच तो उभा होता. एक अधिकारी बहुतेक गावात कोणाची तरी नवीन बदली झाली होता मी त्याच्याकडे पाहिलं, आसपासच्या गर्दीकडे पाहिलं आणि कोणाकडे काही जेवण मिळत आहे का हे बघून लागले. तर मला लक्षात आलं की ती गर्दी त्या गर्दीमध्ये जेवण मिळत होतं म्हणजे भंडारा होता तिथे. आणि तो भंडारा त्या अधिकारीच ठेवला होता,मला खूप भूक लागली होती. मी तीन दिवस झाले उपाशी होते म्हणून मी त्या भंडाऱ्यात गेले आणि जाऊन जेवणाच्या ओळीत मी उभी राहिले. काही वेळाने एका गावकऱ्याने मला ओळखलं की मी तिथे उभी आहे.
त्याने जोरात मला धक्का दिला. मी त्या धक्क्यानंवरती पडणार तितक्यात त्याने मला सावरल . त्याच्याकडे बघितलं तर त्याचं चेहरा मला ओळखीचा वाटला. पण मला कळाले नाही की तो नक्की कोण होता. त्याने मला सावधलं आणि माझ्या हातात एक ताट दिलं. मी ते ताट घेतलं आणि तिकडनं लग्गेलच निघून गेले. बघे कुणाकडे काहीच बघितलं नाही. पण मला माहिती नव्हतं की तो माझ्याकडे टक लावून बघत होता. रात्री मी तेच जेवले. आणि जेवून मी पुन्हा माझ्या माझ्या जंगलात निघून जाणार होते.
तितक्यात त्याचा आवाज आला, रेनुका? मी सुरुवातीला त्याला ओळखलं नाही पण नंतर माझ्या लक्षात आलं की हा तोच माझा मित्र होता जो मला जो एक गाव सोडून निघून गेला होता राघव. असं म्हणून तिने त्याचा हात धरला. तू इतक्या वर्षांनी परत आलास? त्यांच्यामध्ये बरेच संभाषण झालं.
संभाषणानंतर तो म्हणाला तुझी अशी अवस्था कशी काय झाली? तिच्यावरती त्याने त्याची सगळी कहानी सांगितली. हे ऐकून त्याला धक्का बसला. त्याची तीच मनं मिळवू मैत्रिणीच. असंशी झाली होती हे बघून त्याला धक्का बसला होता. पण ती शेवटी म्हणाली, राघव, मला त्यांना शिक्षा द्यायची, मला बाकीच्या मुलींना वाचवायचं. पण मी एकटी करू शकत नाही ही गोष्ट. राघव म्हणाला, मी आहे ना आता आपण दोघं मिळून त्यांना शिक्षा देऊ. असं म्हणून त्याने प्लॅन करायचा निर्णय घेतला. पण सुरुवात इकडनं झाली की तिला जर त्यांच्या पाठीमागे राहायचं असेल तर तिला मंदिरात प्रवेश करावं नाही.
त्यासाठी तिने एक योजना बनवली. दुसऱ्या दिवशी ती पुजारी, त्या विश्वस्थ मंडळी सरपंच यांच्यासमोर हात जोडून उभी राहिली. मला मंदिरात जायचं, माझा जीव, माझा जीव गुंतून राहतोय. मला जेवायला अन्न नाहीये, माझ्या उदरनिर्वाहाचं काही साधन नाहीये
कृपया मला मंदिरात घ्या असं म्हणून मी हातपाया करायला लागली, विनवणी करायला. आणि मी कबूलही केलं की ती खोटारडी होती. आणि पुजारी म्हणजे गागा भट्ट खरा होता. गागा भट्टाने तिला परवानगी दिली मंदिरात राहायची. मंदिरात राहायला राहिल्यावरती ती इथं मंदिरामध्ये आता सगळं बघत होती की कोण कधी कधी येतोय. गागा भट्ट कधी कुठे जातोय. तेव्हा तिच्या एक लक्षात आल
एका रात्री तिच्या लक्षात आलं की गागाभट्ट मंदिराच्या वडाच्या पाठीमागच्या झाडाच्या इथे सगळ्यांबरोबर भेटते. आणि तू आणि विश्वास्त मंडळी काहीतरी योजना बनवत होतो.मी ते ऐकलं तर तिच्या लक्षात आलं की ते येत्या मागे पूर्ण माझ्या दिवशी सगळा देदासी मुलींना विकून टाकणार आहेत. हे ऐकून तिला चांगलाच धक्का बसतो. ती लगोलग राघवला सांगते. आणि मी राघवला म्हणते की आपण एक योजना बनवायची. सर्वात पहिल्यांदा मी जाणार आणि त्या मुलींना सोडवण्याचा प्रयत्न करेन. मागून तू पोलीस घेऊन ये. आपण सगळ्या समोर त्यांना ताब्यात घेऊ. मागे पूर्णिमेच्या दिवशी गावात एक मोठी जत्रा असते. त्याच दिवशी आपण सगळ्या कामासमोर यांचा पर्दाफाश करायचा. असं म्हणून मागे पौर्णिमेचा दिवस येतो. गावात यल्लमा देवीची जत्रा भरते.
आणि हे इकडे वेगळी तयारी करत असतात. मी जाते आणि वडाच्या झाडामागे थांबून त्यांचं सगळं योजना ही डोळ्यांनी होताना बघत असते. त्या मुलींना विकायचा प्रयत्न करतात. तितक्यात मी तिथे येते आणि एक धारदार तलवार त्यांच्यावर उगरते आणि म्हणते सगळ्या मुलींना सोडव. पोलीस येतच असतील तुला पकडायला. त्यांच्यावर ते हल्ले प्रतिहल्ले होतात. तितक्यात पोलीस येतात आणि गागा भट्ट आणि त्याच्या सर्व विश्वस्त मंडळींना पकडून घेऊन जातात माझ्या ध्येय पूर्ण होतं. मी सगळ्या गावकऱ्यांना म्हणते की हा बघा तुमचा तो देवदासीच्या पाठीमागचा लोभी.चेहरा हा आहे तो खरा चेहरा, हा आहे तो खरा लोभी चेहरा. याच्याचमुळे गावातल्या देवदासी मुली बाहेर शहरात विकल्या जात होत्या. या अवकल गावकऱ्यांना बरं धक्का बसतो हे सगळं ती पुरावे निशी सिद्ध करते. आणि पोलिस त्याला पकडून सुद्धा घेऊन जातात.
गावकऱ्यांना माझ कौतुक वाटायला लागतं गावकरी खूप खुश होतात माझ हे काम बघून आणि ते माझ्यावर हळूहळू विश्वास ठेवायला लागले होते. संकट टळल म्हणून गावाच्या त्याच मंदिरात देवीचं भजन होतं. मला कोणी बोलवेल le वाटलं नव्हतं. पण अचानक सरपंच म्हणतात पोरी तू आजच्या या भजनाला गायचं बर का तेव्हा मला धक्का बसतो कारण पण ती त्या भजनाला जाते. आणि तिथे सुंदर भजन गाते. राघव माझ भजन फक्त ऐकत राहतो. भजन झाल्याच्या नंतर सगळे तिच्यासाठी टाळ्या वाजवतात. आणि ती मंदिरातून निघते. तेव्हा राघव तिला म्हणतो, तुला गायखवायचं होतं ना ग? अजूनही संधी गेलेली नाही. तू माझ्याबरोबर मुंबईला चल. तू खूप मोठी गायिका होशील. तिला सुरुवातीला विश्वास नाही बसत. पण माझा राघव वरचा विश्वास आणि त्याचा माझ्यावरचा विश्वास कायम आहे
अशी मी मुंबईमध्ये दाखल झाले मुंबईला बदली मागून घेतली गायिका होण्याच्या अगोदर मी राघव ची झाले आमच लग्न झालं आणि मी गायिका क्षेत्रात पदार्पण करायला सुरुवात केली एकेक टप्पा पार करत हळूहळू कष्ट करत शिकत तिथपर्यंत आले आणि तुमच्या प्रेमामुळे मी इतकी मोठी गायिका झाली प्रत्येक जण ओळखायला लागतं. पण मी माझी जुनी ओळख कधीच बदलली नाही कारण माणसाने कधी आयुष्यात आपले मूळ विसरून नाही नेहमी मुळंशी घट्ट राहावं
ही होती माझी कहाणी मी आयुष्यात अगदी समुद्राचा तळही बघितलाय आणि आकाशाची उंची ही एकावेळी ज्या समाजाने मला वाडी टाकण्याचा प्रयत्न केला आज तोच समाज माझ्या पुढे झुकतो मला या गोष्टीचा अहंकार कधीच नाहीये फक्त एक स्त्री तिच्या अस्तित्वाच्या लढ्यासाठी कुठवर जाऊ शकते याची प्रेरणा आम्हाला स्वतःच्याच कहाणीतून लोकांना जाणून द्यायची “वाह मॅडम खरंच तुमची कहाणी तुमच्याच तोंडून ऐकायला खूप छान वाटलं. अनुराधा मॅडमच्या डोळ्यात पाणी आणि कुठेतरी मला एक अप्रूप दिसत होता”
“बाई तुमची ही कहाणी अगदी प्रेरणादायी आहे. कुठून सुरुवात केली होती तुम्ही आणि आज कुठे येऊन पोहोचलात. प्रत्येक स्त्रीने तुमच्याकडून प्रेरणा घेतली पाहिजे “ पण मला वाटतं प्रत्येक स्त्रीची कहाणी ही प्रेरणादायीच असते, प्रत्येक स्त्रीवर ती जर थोडासा विश्वास दाखवला तर ती काय करू शकते याचं प्रतीक मी वेगळं सांगायची गरज नाही.
माझ्यावर अत्याचार झाले होते तरी त्या मुलींना वाचवण्याचा निर्णय हा माझा होता. तो लढा लढायचा निर्णय हा माझा होता. पण त्याला साथ ही राघवने दिली. म्हणून तर म्हणतात ना, स्त्रियांवरती थोडासा विश्वास ठेवून बघा. तर तुम्हाला कधीच निराश करणार नाही. प्रत्येक स्त्री ही आपल्या आपलं आयुष्य छोटे मोठे युद्ध लढतच असते. फक्त फरक एवढाच की माझं युद्ध लोकांना ऐकळालं. अर्थात प्रत्येक माणसाचा आयुष्य हे एखादं पुस्तक लिहिण्याजोग असतं माझं पुस्तक हे प्रकाशित झाले असे समजा काही स्त्रियांचं युद्ध त्यांना कळत नाही. म्हणून ते पडद्याआड असतं. पण माझ्या मते प्रत्येक स्त्री ही कुठे ना कुठेतरी आई यल्लम देवीचं अवतार “ हे ऐकून अनुराधा टाळ्या वाजवायला लागतात त्या दिवशी लोकांना माझे काही सांगून मला प्रसिद्धी किंवा आधार नको होता मला हवं होतं की प्रत्येक स्त्रीने स्वतःच्या आयुष्यात असाच परिस्थितीचा सामना केला पाहिजे कारण शेवटी आपल्या आयुष्यात शिल्पकार हे आपणच असतो नाही
लेखिका
स्नेहा पंडित