आजचा समाज
प्रत्येक जण आपापलं भलं करण्यात गुंग आहे,
एका बाजूने अप्रगतीच्या वाटेवर सर्वांचा प्रवास मात्र बेधुंद
आहे;
आजचा शिक्षित आंधळा,
तर अशिक्षित पांगळा आहे,
समाज वर जाईलच कसा नेतृत्व करणाऱ्यांचा स्वभावच काळा आहे,
आजचा समाज म्हणजे शिकलेल्या मूकबहिऱ्यांची शाळा आहे,
तर लिहिलेल्या मोडक्या-तोडक्या अक्षरांचा फळा आहे,
हा भ्रष्टाचारी नेत्यांचा गळा, तर श्रीमंतीचा लळा आहे,
समाजाबद्दल बोलायचं झालं तर हा सगळ्यांनी वाचलेला एक जुना पुराना धडा आहे.
कवी:-सुशिल कांबळे,
लातुर.