poetry

शब्द पर्व

मैत्रीण

अशी एक मैत्रिण असावी 

मनात काही न ठेवता 

दिल खुलास बोलणारी


अशी एक मैत्रिण असावी 

बिंधास्त अन् खोडकर असावी 

पण मनाने खुप प्रेमळ असावि


अशी एक मैत्रिण असावी 

जीला बगुनच हसू यावं

अन् तिच्याशी बोलताना 

सर्व दुःख विसरून जावं


अशी एक मैत्रिण असावी 

खूप खूप बोलणारी 

आणि बोलताना बाकिच

जग विसरायला लावणारी