poetry

अजय चव्हाण

मरण.....

मृत्यूचे कोणीच । नाही नातलग ।

प्रेम देत जग । प्रत्येकांना ।।


चालता बोलता । येईल मरण ।

पाहिजे कारण । त्यास कुठे? ।।


अरे वेळ कधी । नाही चुकणार ।

काळ बसणार । डोईवर ।।


जिवंतपणीच । करा काहीतरी ।

पाहण्या श्रीहरी । नयनेने ।।


डोळे शरीराला । कान शरीराला ।

मान शरीराला । आहे वेड्या ।।


आत्म्याला कुठेच । नाही अवयव ।

ऐकणार रव । मग कैसा? ।।


मेल्यावर स्वतः । होशी निराकार ।

काय दिसणार । मग तुला? ।।


कर्म कर योग्य । शरीर जोवर ।

असेल तोवर । वेड्या मना ।।


टाळू नको अजु । चांगल्या व्यक्तीस ।

सुवर्णाचे दिस । त्यांच्यामुळे ।।



©️®️शब्दसखा-अजय रमेश चव्हाण, तरनोळी

ता.दारव्हा, जि.यवतमाळ

मो.८८०५८३६२०७