LEKHAK / MARATHI / POETRY
poetry

संघर्षाची खरी कहाणी

काळी माती, लाल रक्त,हिरवे पीक, रंगहीन पाणी...हाच आहे माझ्या बळीराजाच्या,संघर्षाची खर�…

Written by Kalyani Dudhbade
Published 18 Nov 2026
Reading — min
Kalyani Dudhbade
Kalyani Dudhbade
@6608b101a389
Essay / poetry
01
Kalyani Dudhbade
2026

संघर्षाची खरी कहाणी

काळी माती, लाल रक्त,

हिरवे पीक, रंगहीन पाणी...

हाच आहे माझ्या बळीराजाच्या,

संघर्षाची खरी कहाणी!

शेतकरी माझा बाप, कष्टाचा तो देव,

पण निसर्गाच्या लहरीपुढे, त्याचा नेहमीच जीव टांगणीला ठेव.

डोळ्यांतली स्वप्ने त्याची, जळून झाली राख,

तरीही आभाळाकडे बघत म्हणतो, "निसर्गच करेल माझ्या पिकाची पाठराख."

पाऊस वेळेवर बरसणार,

की आशेचे अंकुर सुकून डोळे दुःखाने भरणार?

तहानलेली ती काळी माती पाहून,

माझे हे तरुण लाल रक्त आता खवळणार!

शेतात हिरवे पीक डोलणार,

का डोळ्यांतून फक्त अश्रूंचे रंगहीन पाणी वाहणार?

अभिमान आहे मला, मी आहे माझ्या बापाची लेक,

त्याचे दुःख तेच माझे दुःख, आमचा श्वास आणि वेदनाही एक!




End of piece 1pam

You may also like

More writing from this category

Readers / Response

वाचकांचे मत

या लिखाणाबद्दल तुमचा अनुभव नोंदवा. एक रेटिंग आणि काही शब्द पुढच्या वाचकासाठीही उपयोगी ठरू शकतात.

0
/ 5.0
0 reader responses
5★
0
4★
0
3★
0
2★
0
1★
0
Leave your response
Select a rating

सर्व प्रतिक्रिया

Newest first
अजून कोणतीही प्रतिक्रिया नाही. पहिली प्रतिक्रिया तुमची असू शकते.