poetry

सतिश अशोक शिंदे

ती -मी =भविष्य

ती -मी =भविष्य

विचार करणे जरा जास्तच आले,



माझे तळतलं मरणे आले

तुझ्यावर सारखं प्रेम करणे आले,


भविष्यासाठी मर मर मरणे आले

तुझ्या आठवणीत रमणे आले,


रडणे आले ओरडणे आले

गुंता सोडवण्यासाठी मनाचा,वारंवार पडणे आले,


गुंग असताना प्रेमात, मग्न मन तुझ्यात होते

हातात हात तुझा डोळ्यात डोळे होते,


गजरा मोगऱ्याचा तुझ्या केसांत होता

झुमका कानात डोलत फार होता,


अंगावर पूर्ण ओढणी होती

इतका साधेपणा तुझं सौंदर्य न्यार होत,


फक्त तुझ्याकडे बघण्यात lecture माझं जात होत

सर म्हणायचे मला सत्या तुझं लक्ष फार होत,


कस सांगायचं किती सांगायचं,

प्रेम अपूर्ण ते कवितेत पूर्ण करण्याच सोंग होत...


माझ्या भविष्यात तुं होती, तो भूतकाळ माझा होता,

तुझ्या वर्तमान मध्ये दुसरा आहे, हे माझं भविष्य आहे...