पोच पावती
विषय : पोचपावती
हे सख्या कस समजावू तुला
माझं खरंच खुप प्रेम तुझ्यावर
तु अस नको सोडू साथ
तुझ प्रेम आहे माझ्या मनावर
तुझ्या माझ्या प्रेमाची चर्चा
आहे साधी सोपी गोष्ट
तुला माझं प्रेम कस समजते
तुला माझं प्रेम असं उमगते
ओढ लागली तुझ्या भेटीची
आता साथ तुझ्या आठवणींची
माझ्या मनात फक्त तूच तू
माझ्या सगळ्या कवितेत तू
तु तुझ प्रेम शब्दात नाही मांडले
पण तुझ्या नजरेतून व्यक्त केले
तुझ प्रेम खरं आहे ते जाणवले
तू प्रेम नाही माझ्या शरीरावर केले
पोचपावती मिळाली मला तुझ्या प्रेमाची
साथ दे मला तुझी नेहमी जन्माची
मेळ असतो हा मनाचा
खेळ नसतो हा शरीराचा
✍️ शब्द पालवी ✍️
सौ. पल्लवी स्वप्निल ढवळे
इचलकरंजी, कोल्हापूर.